February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.19) – महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीची धारदार हत्याराने अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी घरात येऊन गळ्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण मुरमी गावात खळबळ उडाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मुरमी गावातील वैष्णवी संतोष निळ (वय 17) ही आई वडील लहान भाऊ आजोबा यांच्यासह भीलवाडा परिसरात राहत होती. तिचे वडील बिडकीन रोडवर शेतासमोरच पान टपरी चालवतात.

तर वैष्णवी निळ ही वाळूज येथील श्री साईनाथ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात आरोपीने घरात येऊन अज्ञात कारणासाठी वैष्णवी हिच्या गळ्यावर कुऱ्हाडी सारख्या धारदार हत्याराने वार करून तिचा निर्घुण खून केला.

दुपारी चार वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस येताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी फौजफाट्यास घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान स्वान पथक, फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली असून वाळूज पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासणी केली.

दरम्यान पोलिसांनी वैष्णवी निळ हीचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी घाटीत दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मथुराबाई संतोष निळ यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          एकूलती एक मुलगी होती वैष्णवी –                      संतोष यादवराव निळ आणि मथुरा संतोष निळ यांना वैष्णवी ही एकुलती एकच मुलगी आणि प्रितेश हा एकच मुलगा आहे. वैष्णवी ही घरातील मोठी असल्याने तिचा आई-वडील, आजोबा व भाऊ सर्वच लाड करत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ती सकाळी कॉलेजला जाऊन घरी आली होती. दुपारी तिचे 70 वर्षीय आजोबा यादवराव निळ हे घराबाहेर काही अंतरावर बसलेले होते. तर वैष्णवी घरात काम करत होती. त्याच वेळी अज्ञात आरोपीने घरात येऊन तिची हत्या केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *