वाळूजमहानगर (ता.14) : – जीवनात कसं वागावं, कसं जीवन जगावं, याबाबतचे सात्विक विचार संत महात्मे देतात. त्यामुळे जीवनाचा उद्धार होतो. किती दिवस मनुष्य जगला, त्यापेक्षा तो कसा जगला. हे महत्त्वाचे आहे. म्हणून चांगले कार्य करून जीवन सार्थ करा. प्रबोधनात्मक मार्गदर्शन ह भ प जायराज बाबा शास्त्री यांनी केले.
बकवालनगर येथे निळ पाटील परिवाराच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व दिपावली स्रेहमिलन कार्यक्रम सोमवारी (ता.14) रोजी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी ह भ प जायराज बाबा शास्त्री यांनी सनातन हिंदू धर्म व संत महात्म्य यांचे आपल्या जीवनातील महत्त्व यावरप्रबोधन केले. कार्यक्रमाला प.पु.यल्हेराज बाबा शास्त्री, प.पु.रामचंद्र बाबा बीडकर, प.पु.गोपीराज बाबा पाचराऊत, प.पु.कैलासगिरी महाराज, ह.भ.प.नारायण नंदगिरी महाराज, ह.भ.प. नंदु महाराज फांदाडे, ह.भ.प.दादा महाराज वायसळ, ह.भ.प.अरुण महाराज डोळस, ह.भ.प.डॉ.जनार्दन महाराज मेटे, ह.भ.प. शिवाजी महाराज काळे, ह.प.भ. बाळकृष्ण महाराज दिघे, ह.भ.प. हरिप्रसाद शास्त्री बोबडे, ह.भ.प.विठ्ठल शास्त्री चनघटे, ह.भ.प.विजय महाराज खेडकर, ह.प.प. प्रदिप महाराज धनक, ह.भ.प. सिध्देश्वर महाराज भगत आदींची उपस्थिती होती. प्रथम रविवारी (ता.13) सांयकाळी ह.भ.प.सुदाम महाराज कातकडे यांनी किर्तनातुन समाजप्रबोधन केले. सोमवारी (ता.14) रोजी सकाळी श्री मुर्तीस मंगलस्रान, वीडाअवसर, फुलहार, श्रीमद भागवत गितापाठ, ध्वजारोहन आदी कार्यक्रम होऊन सकाळी 10 वाजता ह.भ.प.सुदाम शास्त्री महाराज यांचे प्रवचन व पंचावतार उपहार आरती करण्यात आली. या कार्यक्रमानंतर दिपावली स्रेह मिलन कार्यक्रमात प.पु.जयराज बाबा शास्त्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष माने, सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर पा.निळ, नगरसेवक प्रदिप पाटील, रमेश आरगडे, वाल्मिक शिरसाठ, अॅड.नानासाहेब झिंझुर्डे, शिवाजी निळ, सलमान शेख, सरपंच गजानन बोंबले, शंकर राठोड, सूर्यभान काजळे, नजीरखा पठाण, भारत गरड, कल्याणराव गरड, सुरेश वाघचौरे आदींसह अनेकांनी उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले. ज्येष्ठ नागरिक रंगनाथ निळ, लक्ष्मण निळ, डॉ.ज्ञानेश्वर निळ, किरण निळ, हरिप्रसाद निळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.