February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – संत निरंकारी मंडळाच्या वाळुज (बजाजनगर) विभागाच्या वतीने बजाजनगर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात बजाजनगर, रांजणगाव तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातील 313 रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रविवारी (ता.26) रोजी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

श्री जागुत हनुमान मंदीर, बजाजनगर येथे सकाळी रविवारी (ता.26) रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान झालेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी संत निरंकारी मंडळाच्या समाजसेवेबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी उद्योजक हनुमान भोंडवे, वृक्ष बँकेचे विष्णुदास पाटील, जागुत हनुमान मंदीर संस्थानचे अध्यक्ष बी यु वानखेडे, संत निरंकारी मंडळाचे शाखाप्रमुख शिवाजी कुबडे तसेच घाटी रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. सुनिता बनकर, तिसगावचे माजी उपसरपंच नागेश कुठारे, उद्योजक अर्जुन आदमाने, दशरथ मुळे, श्रीकांत साळे, रमाकांत भांगे, राम पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. “रक्त हे रस्तावर वाहन्यापेक्षा ते मानवाच्या धमन्यांमध्ये वाहिले पाहीजे” हा संदेश निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी संपुर्ण विश्वाला दिला. त्यांच्या उक्तीनुसार दरवर्षी अशा रक्तदान शिबीराचे आयोजन संपुर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 8 वर्षांपासुन वाळुज (बजाजनगर) शाखेत अशा भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबीरासाठी बजाजनगर, रांणजगाव, वाळुज, वडगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाण्याहुन रक्तदाते एकत्रित आले होते. शासकिय रुग्णालय (घाटी) च्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात डॉ. ज्योती उगलमुगले, डॉ. पदमा जैन यांच्यासह 25 डॉक्टरांच्या टीमने रक्त संकलन केले. निरंकारी मंडळाच्या वाळुज सेवादल युनिटने या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.

या महान रक्तदान अभियानाच्या जनजागुती साठी 24 नोव्हेंबर रोजी वाहन काढण्यात आली होती. या वाहन रॅलीमध्ये रक्तदानाचे महत्व दर्शविणारे फलक घेउन संत निरंकारी मंडळाच्या सेवादल स्वंयसेवक उत्सफुर्त भाग घेतला. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात 313 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *