March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.11) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ-त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिश गुरूमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने बजाजनगर येथील सेवा केंद्रात श्री गुरू पौर्णिमे निमित्ताने श्री गुरू पुजन करून गुरूपद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक, सेवेकऱ्यांची दिवसभर गर्दी केली होती.

प्रथम पहाटे 5 वाजता सामुदायिक महाभिषेकानंतर उत्सवाला सुरवात झाली. सेवा मार्गाच्या 20 टक्के अध्यात्म आणि 80 टक्के समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन सेवा मार्गाला अपेक्षित अनेक सामाजिक उपक्रम बजाजनगर सेवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आले. यामध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीराचा समावेश होता.
मोफत सर्व रोग निदान शिबीरामध्ये परिसरातील 15 तज्ञ डॉक्टरांच्या टिमने विनामूल्य सेवा करून समाजकार्यात सहभाग नोंदवला. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले. दिवसभरात सेवेकऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेत 8 हजार 732 सेवेकऱ्यांनी श्री गुरूपुजन करून गुरूपद घेतले. एकुण 107 सेवेकऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला. तसेच 850 पेक्षा जास्त भाविक सेवेकऱ्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला.

उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी बजाजनगर सेवा केंद्रातील युवा प्रबोधन प्रतिनिधी व सर्व सेवेकऱ्यांनी प्रयत्न केले .

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *