February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.19) – बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती निमित्ताने अखंड-नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. या सप्ताहाला 20 डिसेंबर पासून सुरवात होत असून 27 डिसेंबर 2023 रोजी महानैव्यद्य आरतीने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात हजारोंच्या संख्येने सेवेकरी श्री गुरूचरीञ पारायणासाठी बसणार आहेत.

20 डिसेंबर रोजी मंडलस्थापना, स्थापित देवता अवाहन व अग्निस्थापना करून उत्सवाला सुरवात होणार आहे. दैनंदिनी मध्ये सकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाभिषेक, 7.30 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 8 वाजता भूपाळी आरती, 8.15 वाजता नित्यस्वाहाकार, 8.30 ते 10.30 पर्यंत सामुदायिक श्री गुरूचरीञ पारायण, 10.30 वाजता नैवेद्य आरती, 10.45 ते 12 वाजेपर्यंत विषेश याग, दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती पाठ व श्री रूद्रावर्तने, सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी 6.30 वाजता नैवेद्य आरती, 7 वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, 7.30 वाजता श्री विष्णू सहस्त्रनाम होणार आहे. तसेच रोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत महिला सेवेकरी व रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत पुरूष सेवेकरी प्रहरेची सेवा रूजू करणार आहे.

विषेश यागामध्ये दिनांक 21 डिसेंबर रोजी श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, 22 डिसेंबर रोजी गिताई याग, 23 डिसेंबर रोजी स्वामी याग, 24 डिसेंबर रोजी चंडी याग, 25 डिसेंबर रोजी श्री रूद्र याग होणार आहे. 26 डिसेंबर रोजी बली पूर्णाहूती होऊन दुपारी 12.39 वाजता श्री गुरूचरीञ ग्रंथातील श्री दत्त जन्माचा चौथा अध्यायाचे वाचन करून महानैवेद्य आरतीने श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच 27 डिसेंबर रोजी श्री सत्य दत्त पूजन, देवता विसर्जन करून सप्ताहाची सांगता होणार आहे.
धकाधकीच्या जीवनात अध्यात्मिक स्थैर्य व मनःशांती मिळवण्यासाठी सप्ताहकाळ ही अभूतपूर्व पर्वणी ठरणार आहे. बजाजनगर केंद्रातील व्यवस्थापन व नियोजन प्रतिनीधींच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व भाविक सज्जन, भक्तगण व सेवेकरी यांना या अतिदुर्लभ अध्यात्मिक सेवेत सहभागी होऊन स्थापित देवतांचे कृपाशिर्वाद प्राप्त करून घेण्याचे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *