March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 6) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी जाहीर करण्यात आला. यात वाळूज येथील श्री.साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 95.34 टक्के निकाल लागला.

बारावी बोर्ड परीक्षासाठी विद्यालयातील एकूण 86 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात कला शाखेतून 61 विद्यार्थी तर एम.सी.व्ही.सी. शाखेतून 25 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये विशेष प्राविण्यासह 6 विद्यार्थी, प्रथम श्रेणीतून 48 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीतून 26 विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीतून 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कला शाखेतून शेख मोहसीना मकसूद 80.67% प्रथम, अमृता सोमनाथ शिंदे 80.50% द्वितीय, तर श्रावणी सुभाष त्रिभुवन 75.50% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम.सी.व्ही.सी. शाखेतून कोमल मधुकर तांबे 87.17% प्रथम, एकनाथ भानुदास गरड 77.17% द्वितीय, तर रुपेश विजय मोकळ 75.17% मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे सचिव विलासराव राऊत, संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रमिलाताई राऊत, तसेच प्राचार्या वंदना बेडसे यांनी स्वागत करत कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *