वाळुज महानगर, (ता.22)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी जाहीर करण्यात आला. यात वाळूज येथील श्री साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 96.55 टक्के निकाल लागला.
या परीक्षेसाठी वाळूज येथील श्री साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एकूण 116 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात कला शाखेतून 83 विद्यार्थी तर एम.सी.व्ही.सी. शाखेतून 33 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये विशेष प्राविण्यासह 11 विद्यार्थी, प्रथम श्रेणीतून 68 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीतून 29 विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीतून 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतून शुभांगी लक्ष्मण व्यवहारे 82.67 प्रथम, अनम शरीफ शेख 79.50 द्वितीय, तर सोनाली संजय जाधव 78.50 मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम.सी.व्ही.सी. शाखेतून उमेश हरिश्चंद्र साबळे 75.67 प्रथम, ऋषिकेश गोविंद बोचरे 73.33 द्वितीय, तर सौरभ गणेश लघाने 72 टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे सचिव विलासराव राऊत, संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रमिलाताई राऊत, तसेच प्राचार्या वंदना बेडसे यांनी स्वागत केले.