February 5, 2026

   

वाळुज महानगर, (ता.28)- वाळूज येथील श्री साईनाथ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण प्राचार्य वंदना बेडसे यांचे हस्ते करण्यात आले.

         या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विलासराव राऊत, कोषाध्यक्षा प्रमिलाताई राऊत, सायलीताई राऊत तसेच 2002-2003 मधील बारावीतील माजी विद्यार्थी विनोद चव्हाण, रामेश्वर वडगावकर, मुस्ताक शेख, नीरज साकला, विजय दणक, मिरा करे, गणेश सुरडकर, महेश भवार, ईश्वर जाधव, वैभव वडगावकर, योगेश जाधव, नासेर सय्यद, लक्ष्मण दणके, योगेश बोरुडे, अमोल आळंजकर, अनिस शेख, दादासाहेब थोरात, गुलाब पठाण उपस्थित होते. यावेळी माजी विदयार्थी योगेश जाधव याने प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यावर मार्गदर्शन करून पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद करणारी भाषणे केली. व देशभक्तीपर गीतांचे सुरेल गायन केले.

कार्यक्रमास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधीर गुरनाळकर यांनी केले. सुत्रसंचलन सुधीर गुरनाळकर यांनी, तर आभार सविता भालेकर  यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *