March 24, 2026

  1. वाळूज महानगर, (ता.27) – श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पुं.) येथे कारगिल विजयी दिन व मातोश्री मुक्ताई धोंडगे स्मृति दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते. तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबादचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर मुरकुटे होते. पर्यवेक्षिका सरोज पवार, शालेय समितीचे विजयसिंह परदेशी व सोमासे उपस्थित होते.

कारगिल विजयी दिनानिमित्त व मातोश्री मुक्ताई स्मृतिदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच विद्यार्थिनीनी देशभक्तीपर सामूहिक गीत गायन केले. मातोश्री मुक्ताई यांच्या कार्याबद्दल शाळेतील शिक्षक सुरेश घोरबांड यांनी मार्गदर्शन केले. तर कारगिल विजयी दिनानिमित्त शिवकुमार होनराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.‌ प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी दहावी वर्गात प्रत्येक विषयात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात आली. तसेच शाळेतील गरीब होतकरु अनाथ मुली व मुलांना शाळेच्या वतीने युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रभाकर मुरकुटे यांनी आई विषयी असलेले मुलांचे प्रेम, मातोश्री मुक्ताई आणि केशवराव यांचे जिव्हाळ्याचे संबंध याविषयी माहिती दिली.

तसेच काश्मीरचे जम्मू हिंदू बहुभाग, श्रीनगर मुस्लिम बहुभाग, लेह- लडाख, सियाचीन, पाक व्याप्त काश्मीर या पाच प्रांताची भौगोलिक परिस्थितीची माहिती विद्यार्थ्याला देऊन कारगिलचा विजय कसा झाला व आज तेथे शहिदांना श्रद्धांजली अर्पित कशी करतात. याविषयी सविस्तर माहिती देत तेथे असलेल्या प्रत्येक शहिदांच्या नावाच्या स्टोनची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी मातोश्री मुक्ताई यांच्या प्रेरणेने साहेबांनी शैक्षणिक संस्थेचा कसा विकास केला. सद्या संस्थेत 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यावेळी वस्तीगृह कसे चालवले मातोश्रीने विद्यार्थ्यांना भाकरी थापून कश्या घातल्या. याची सविस्तर वर्णन करुन लॉ कॉलेज च्या स्थापनेचा इतिहास सांगून कारगिल येथील शहिदांना अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भांड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सविता गोसावी यांनी तर प्रास्ताविक वैशाली सपकाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने, भगवान वनारसे, संतोष बंडेवार, विजयसिंह परदेशी, रमा आडे, ज्योती भालेराव, आशा साळुंखे, दादासाहेब हजारे, तारामती हावरगे, सतीश जावळे, प्राथमिक विभागाचे गणेश गिरी, गणेश कदम, ज्ञानेश्वर कौसले, प्रल्हाद राठोड, मारुती सुरनर, महेश नागेश्वर यांनी काम पाहिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *