
वाळुज महानगर, (ता.15) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री शिवाजी विद्यालयात श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संस्थापक माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांची 104 वी जयंती शुक्रवारी 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.रविंद्र साहेबराव खरात होते. 
यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्यकारीणी सदस्य प्रा.डॉ.धनंजय माणिकराव पवार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तथा पंचायत समिती सदस्य दिपक बडे, प्रा.प्रदीप चिंतामणी, शालेय समिती सदस्य सोमनाथ हिवाळे, फिटनेस क्लबचे शुभम जाधव, अश्विनी खंडागळे, रंजना गायके, शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे, शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली सपकाळ, शिवकुमार होनराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश सुलताने, अनिल भांड उपस्थित होते. 
प्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री मुक्ताई डॉ.केशवराव धोंडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महेश नागेश्वरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शाळेतील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. याच बरोबर शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. काही गणवेश श्री शिवाजी एम.सी.व्हि.सी. महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्रा. प्रदीप मिठूशेठ चिंतामणी यांनी दिले. तसेच सतीश जावळे यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त दोन ड्रेस विद्यार्थ्यांना दिले. शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या विविध पैलूंचे महत्व सांगून संस्थेचा वट वृक्ष कशा पद्धतीने वाढवला. याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. संस्था कार्यकारिणी सदस्य प्रा डॉ.धनंजय पवार यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळवत संस्थेतील विविध शाखेची माहिती सांगितली. तसेच संस्थेचा चढता आलेख कसा वाढत गेला याची माहिती सांगितली. हे सर्व श्रेय केशवराव धोंडगे यांना जातं. असेही त्यांनी सांगितले. तसेच संस्थेतील अनेक अनुभव सांगितले. अस्थिर परिस्थितीतून संस्था कशी वाढली यांचे अनेक उदाहरणे डॉ.धनंजय पवार सरांनी दिले. बाजार समिती सदस्य दिपक बडे यांनी रांजणगावात पहिली अनुदानित शाळा धोंगडे साहेबांनी आणून कामगाराच्या मुलांना मोफत प्रवेश देऊन जो उपक्रम राबवला तो स्तुत आहे. त्यांचा वसा अजूनही शाळा चालवते. हिच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. प्रा. प्रदीप चिंतामणी यांनी शाळेतील गरीब गुणवंत मुलांना युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र खरात यांनी धोंगडे यांच्या घरी गेल्यानंतर जो आम्हाला अनुभव आला तो विद्यार्थ्यांसमोर मांडला. साहेब रोज सकाळी चार वाजता उठून जय क्रांती मासिकाचे व स्वतःच्या पुस्तकाचे लेखन करायचे व नंतर प्राणायाम योगा अभ्यास करायचे हे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञानेश्वर कौशल्ये यांनी उपस्थित पाहुण्यांचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन अनिल भांड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान वनारसे, विजय जाधव, संतोष बंडेवार, गिरधर पवार, आशा साळुंखे , गणेश गिरी, मारुती राठोड, मारोती सरनर, कालेश्वर भुरे, सतीश जावळे यांनी सहकार्य केले.
