
वाळुज महानगर, (ता. 9) – बजाजनगर येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावतीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांनी मंगळवार 8 जुलै रोजी सायंकाळी भेट दिली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना घेऊन घुमे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी गमे यांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्व व श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्याची माहिती देऊन उपस्थित गुरुदेव सेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मराठवाडा प्रांत सर्वाधिकारी मनिष जयस्वाल यांनी संत भूमी मराठवाड्यातील मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी गमे व त्यांचे सहकारी अतिथी पुरुषोत्तम भोयर (गुरुकुंज मोझरी), वसंतराव धोंदरे (चंद्रपूर) आदींचा श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगर तर्फे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गजानन मानकर, ज्ञानेश्वर दरेकर, ज्ञानेश्वर धुर्वे, रामकृष्ण जाधव, नेमिनाथ खरबडे, गणेश पळसकर, केशवराव बुले, प्रमोद देशमुख, भागवत सांभारे, सुभाष बुले, श्रीकृष्ण काळे, राजाभाऊ ठाकरे, श्रीकृष्ण अंबाडकर, दिवाकर हुसनापुरे, विनोद माळवी, गजानन तूपसुंदर, प्रमोद नाल्हे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
