
वाळूजमहानगर, (ता.9) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर शाळेत पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारी गुढी उभारून विद्यार्थ्यांनी मराठी नववर्षाची सुरुवात केली.
या प्रसंगी नवीन संकल्प, पर्यावरणाचे संगोपन व जोपासना या बाबतीत अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नववर्षाची सुरुवात पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करण्यात आला. तसेच कागदी गुढी उभारण्याविषयी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बसुदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, मनीषा नवथर, स्वाती सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, संदीप हिंगणकर, गुलाब मोहिते, परमेश्वर गीते, सौरभ लगड, उल्हास वाघ, सुनील शिंदे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
