वाळूजमहानगर, (ता.27) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज, बसवंतराव इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत 75 वा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी (ता26) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम भाजपाचे वरिष्ठ नेते गंगाराम हिवाळे यांच्या हस्ते प्रतिमा व ध्वज पूजन करण्यात आले. तर ध्वजारोहण उद्योजक अशोक बोराडे यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य दीपक बडे, सरपंच योगिता महालकर, माजी सभापती विठ्ठलराव कोळेकर, पंकज हिवाळे, उद्योजक कैलास सोनवणे, जयवंत गाडेकर, पालक प्रतिनिधी बालाजी घुले, पुरुषोत्तम पदार, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, कल्याण कुलकर्णी, मनीषा नवथर, संजय तुपे, भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत व सविधान वाचन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतून थोर पुरुषांच्या वेशभूषेत रॅली काढण्यात आली. रॅलीत झांज पथक, लेझीम पथक, ढोल पथक व शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शाळेतील विविध खेळात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कराटे यांचे विविध राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय मिळालेले मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र वाटप करून विद्यार्थी, पालक व प्रशिक्षक जब्बार पठाण, राहुल दोंदे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ललित कला महोत्सवात नृत्य स्पर्धेत यशस्वी झालेल्या लक्ष्मी पालवे, शिवानी तारडे, श्रद्धा जाधव यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मॅथ ऑलम्पियाड परीक्षेत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेश मुटकुळे याचा व पालकाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, हनुमान जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नवथर, तर आभार संदीप हिंगणकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, अश्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, स्वाती सूर्यवंशी, छाया वागदरे, निकिता देशमुख, जयश्री पाटील, अश्विनी थोरात, शुभांगी मिसाळ, निलेश पाटील, दीपक कोळी, दीपक पठारे, सुभाष जाधव, पूजा गिरी, जब्बार पठाण, विनय अवसरमोल, विनायक वाघमारे, तेजेराव तलवारे, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले.
