
वाळूजमहानगर, (ता.20)- रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेतून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत झांज पथक, लेझीम पथक, भव्य ढोल पथक, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ वेशभूषेतील विद्यार्थी यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी द्वारे दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केले. त्याचबरोबर प्रवीण पाईकराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराबद्दल मार्मिक भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्रा.विभाग प्रमुख कल्याण कुलकर्णी, मनीषा नवथर, माध्यमिक विभाग प्रमुख संजय तुपे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती झाडे तसेच आभार मुख्याध्यापक रेखा बिदरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, परमेश्वर गीते, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, अश्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, स्वाती सूर्यवंशी, छाया वागदरे, निकिता देशमुख, जयश्री पाटील, अश्विनी थोरात, शुभांगी मिसाळ, निलेश पाटील, दीपक कोळी, दीपक पठारे, गोरवाडकर, पूजा गिरी, जब्बार पठाण, विनय अवसरमोल, विनायक वाघमारे, प्रल्हाद मंगनाळे, लता वैष्णव, सोनी कुमारी, पूजा खोतकर, अस्मिता तायडे, विजया पवार, हर्षदा भुंबे, अर्चना बुर्जे, पूजा खोतकर, ममता खोतकर, पूजा ठाकूर, प्रिती नरवाडे, संभाजी जाधव, विजया पवार आदींनी परिश्रम घेतले.
