
वाळूजमहानगर, (ता.28) – रांजणगाव (शें,पू) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर आणि बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने ढोलताशे पथक, लेझीम पथक व पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. दरम्यान हरी नामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमला होता.
यावेळी झालेल्या भक्तिमय वातावरणात शिक्षक, विद्यार्थ्यांनी फुगडी खेळली. टाळ, मृदंग व हरिनामाचा जयघोष या मुळेजणू काही शाळेत हरी नामाची शाळाच भरली. असे चित्र यावेळी होते. भजन करणारे छोटे वारकरी पाहून परिसरातील नागरिकांनी मुलांचे कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष आय जी जाधव, सुरेखा बस्वदे, सचिव हरीश जाधव, मुख्याध्यापक एम.व्ही. शिनगारे, रेखा बिदरकर, शहाजी मंगनाळे, हनुमंत जाधव, संजय तुपे, दीपक कोळी, जब्बार पठाण, मनिषा नवथर, सुरेखा शिंदे, अंकिता कुरे, संदीप हिंगनकर, उल्हास वाघ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
