
वाळुज महानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्यामंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत भव्य रॅली काढण्यात आली.
या रॅलीत झांज पथक, लेझीम पथक तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास सरपंच कविताताई हिवाळे, बाबुराव हिवाळे, पंकज हिवाळे, संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ, रेखा बिदरकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पूजा खोतकर यांनी तर आभार रेखा बिदरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, परमेश्वर गीते, संदीप हिंगणकर, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, अनुराधा मुळे, छाया वाघदरे, दिपक पठारे, पूजा गिरी, विनय अवसरमल, तृप्ती लकडे, दिलीप ढोले, सानिया पठाण, विजया पवार, प्रल्हाद मंगनाळे, सोनी शुक्ला, दीक्षा बोपचे, प्रतिभा मुंडे, कल्पना निकाळजे आदीनी परिश्रम घेतले.
