February 5, 2026


वाळूजमहानगर, ता.26 – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुऱ्हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गुरुवारी (ता.23) रोजी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, संस्थेचे सचिव हारीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, हनुमंत जाधव, भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून झाली. याप्रसंगी प्रगती लीपने, पवार आरती, ओजस्वी लोहार, परिणीती देशमुख, भूमी वैद्य, आर्या कदम, अनुजा देवरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, हनुमान जाधव यांनी आपल्या मार्मिक भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप हिंगणकर यांनी इतर आभार परमेश्वर गीते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहाजी मंगनाळे, कल्याण कुलकर्णी, अशोक तारडे, विशाल जाधव, गुलाब मोहिते, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, अनुराधा मुळे, स्वाती सूर्यवंशी, छाया वाघदरे, दिलीप ढोले, साजिद शेख, स्वाती पाटील, डिंपल टोके, तृप्ती लकडे, हर्षदा भोबे, सुरेखा शिंदे, अस्मिता तायडे ,मयुरी मराठे, मयुरी चव्हाण, सोनी कुमारी, क्रांती पवार, पूजा मौर्य, प्रीती नरवाडे, पूजा गिरी, विनय अवसरमोल, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *