वाळूजमहानगर, ता.20 – रांजणगाव (शेंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेत इयत्ता सहावीतील राजवीर दिलीप नलवाडे तर नववी वर्गातील प्रांजली रमेश देवकर व ओमकार रामकिसन जगधाने या विद्यार्थ्यांच्या अतुलनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने पालकासमवेत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव, संस्थेचे सचिव हारीष जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक रेखा बिदरकर, भाऊसाहेब शिरसाट, पालक दिलीप नलावडे, रमेश देवकर ,रामकिसन जगधने शिक्षक वर्ग सौरभ लगड ,गुलाब मोहिते, परमेश्वर गीते , संदीप हिंगणकर, अशोक तारडे, कल्याण कुलकर्णी, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, संजीवनी चीकाळे, छाया वागदरे ,अनुराधा मुळे, गंगासागर बोराडे, सुनील शिंदे, उल्हास वाघ, रोशनी नेरपगार, शुभांगी नेरपगारे , दिपक पठारे, पूजा गिरी, स्वाती पाटील, तृप्ती लकडे,जबार पठाण, विनय अवसरमल, विनायक वाघमारे, डिंपल टोके , दीपक ढोले, लता वैष्णव, पूजा खोतकर,अस्मिता तायडे, अर्चना भुर्जे ,प्रीती नरवाडे, पूजा ठाकूर, विनय अवसरमोल, प्रल्हाद मंगनाळे आदींची उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांना श्री गजानन विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक पूजा गीरी, शेख साजिद,सोनी कुमारी, हर्षदा भोंबे, विशाल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.