
वाळूजमहानगर, (ता.6) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल तसेच बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल आणि श्री गजानन जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रांजणगाव परिसरात शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या भाषणातून बाबासाहेबांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी भीम गीतातूनही श्रद्धांजली अर्पण केली. विशेष बाब म्हणजे शाळेमध्ये 18 तास अभ्यासिकेचे आयोजन करण्यात आले होते. यात 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अभ्यासिका सकाळी सहा वाजता सुरू होऊन रात्री बारा वाजता समारोप करण्यात आला. या अभ्यासिकेचे नियोजन मुख्याध्यापक एम व्ही शिंनगारे यांनी केले होते. यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, बी व्ही सिरसाट, मीरा देशपांडे, रेखा बिदरकर, प्राचार्य डॉक्टर महेश शिंनगारे, प्राध्यापक संजय तुपे,तेजराव तलवारे, हनुमान जाधव, नीलिमा रेळेकर, पूजा गिरी, दीपक कोळी, दीपक पठारे, विशाल जाधव, संदीप हिंगणकर, कल्याण कुलकर्णी, शहाजी मंगनाळे, प्रीती नरवाडे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
