March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – रांजणगाव (शे.पू.) येथील श्री गजानन माध्यमिक विद्या मंदिर व बसवंतराव पाटील माध्यमिक इंग्लिश स्कूल शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील इयत्ता 10 वी बोर्ड चा 100 टक्के निकाला असून निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

श्री गजानन माध्यमिक विद्या मंदिरमधून प्रथम क्रमांक बिडवे समृद्धी 95.20 टक्के, द्वितीय क्रमांक बेंद्रे वैष्णवी 94.60 टक्के या विद्यार्थिनीला गणित (भाग 1+भाग 2) या विषयात संपूर्ण 100 गुण प्राप्त झाले आहेत. तर आढाव वैभव माने 91.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच बसवंतराव पाटील माध्यमिक इंग्लिश स्कूलमधील प्रथम क्रमांक राठोड सुदर्शन 90.80 टक्के, व थोरात सोमेश 90.80 टक्के, द्वितीय क्रमांक डाकोरे संध्या 89.60, तृतीय क्रमांक साबळे मानसी 88.80 विद्यार्थ्यानी गुण संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या वतीने विध्यार्थी व पालकांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हरीश जाधव, मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे बी. व्ही. सिरसाठ, एच. बी. जाधव, संजय तुपे, दीपक कोळी, निलीमा रेळेकर, पूजा गिरी, दीपक पठारे, पी एस नरवाडे, जब्बार पठाण, एस.यु.जाधव यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *