श्री गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
वाळूजमहानगर rknewslive
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त शिवाजीनगर वाळूज परिसरातील कलानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. कलानगर नागरिकांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या ग्राम स्वच्छता अभियानात मंदिर परिसरातील गाजर गवत उपटून टाकत व केर कचरा एकत्र जमा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी उदयोन्मुख कवी सोपान महाराज चव्हाण, गणेश जगताप, आर के भराड, अनंत वाघ, नामदेव मोरे, महेश पदार, योगेश चिमखडे, महेंद्र बोराडे आदींची उपस्थिती होती.