March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.10)- वाळुज येथील शिवाजीनगर परिसरात असलेल्या कलानगरातील श्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाने शिवरात्रोत्सव शुक्रवारी (ता.8) रोजी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरा करण्यात आला.


कलानगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता.8) रोजी शिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम सकाळी श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या वतीने श्री गजानन महाराज मूर्तीची पूजा करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा वाळूज ग्रामपंचायत सदस्य सचिनभाऊ काकडे यांच्या हस्ते श्री गजानन महाराज यांची आरती करण्यात येऊन साबुदाणा खिचडीच्या स्वरूपात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे सचिन पानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळूज शहर उपाध्यक्ष संजय काजळे, साईनाथभाऊ वाकचौरे, किरण वाकचौरे, अतुल शेवाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे आर के भराड, गणेश जगताप, हभप सोमनाथ महाराज राऊत, योगेश चिमखडे, अनंता वाघ, दत्तू इले, ज्ञानेश्वर आळंजकर, राजू आळंजकर, पांडुरंग राऊत, नामदेव मोरे, रामदास वाघ, महेश पदार, नंदू क्षीरसागर, महेंद्र बोराडे, आकाश म्हस्के, आप्पा शेवाळे व रुस्तुम शेवाळे, हरी गोरे, भाऊसाहेब जेजुरकर, गौरव शिंदे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *