लिंबेजळगाव – नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सरलाबेट संस्थान येथे दुर्गाष्टमी उत्सवाचे आयोजन सोमवारी (ता.3) रोजी करण्यात आले आहे. सरलाबेटावर होणार्या होम हावण व गुरुमंत्र कार्यक्रमासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
अश्विन शुद्ध अष्टमी शके १९४४, शुभकृतनाम संवत्सरे सोमवारी (ता. ३) रोजी सकाळी ११ ते१२ या वेळेत गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांचे अमृतमय वाणीतुन सुश्राव्य प्रवचन भाविकांना श्रवण करता येईल. योगीराज सद्गुरू गंगागीरी महाराज, सद्गुरू नारायणगीरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व महंत गुरुवर्य रामगीरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात आली असून भाविकांनी या ज्ञानयज्ञ सोहळयात आनंदाचा क्षण तेवत ठेऊन लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू गंगागीरी महाराज श्री क्षेत्र सरलाबेट संस्थान व भाविकांनी केले आहे. होमहवण व पुर्णाहुतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.