March 23, 2026

लिंबेजळगाव (ता.3) :- विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, व भजनाचा गजर करीत फाल्गुन शुद्ध आमलकी ‘भागवत एकादशी’ निमित्त श्री क्षेत्र लिंबे जळगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) 13 किमी पायीवारी दिंडी सोहळा शुक्रवारी 3 मार्च मोठ्या उत्साहात झाला.

जळगाव येथून ही दिंडी सकाळी मार्गस्थ होऊन दुपारी पोचली. श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) येथे महाआरती करण्यात आली. तसेच हरी नामाचा जप करण्यात आला. हभप उद्धव महाराज आनंदें, हभप रामायणाचार्य‌ संजय महाराज कुर्हाडे, हभप पांडुरंग काका महाराज पळसकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली प्रारंभ झालेल्या या दिंडी ‌‌सोहळ्यात दर महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीला वाळुज -पंढरपूर येथे तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र शेंदुरवादा येथील श्री सिंदुरात्मक गणपतीला जाते. या पायीवारीत असंख्य वारकरी, भाविकांनी सहभाग घेऊन जीवनाचे मुल्य ओळखत आपला उत्कर्ष साधला. या सोहळ्यात शुक्रवारी 100 च्या जवळपास, असंख्य भाविक, महीला वारकरी,हभप विणेकरी हभप अर्जुन गवळी आन्ना, चोपदार ज्ञानेश्वर माऊली मोरे, 5 झेंडेकरी, तसेच भजनी मंडळ आदीसह‌ रामनगर, शिरुडी, भगतवाडी, अफजलपुर, लिंबेजळगाव, शिवराई, वाळूजसह महीला वर्ग व भाविकांची उपस्थिती होती. भागवत एकादशी निमित्त हभप मुकुंद महाराज विधाते यांची हरीकीर्तन सेवा श्रवण करुन उपस्थित भाविकांनी फलहार केला. दरम्यान दिंडीला हभप नंदकुमार जगताप, हभप नितीन लबडे व वाळूज येथील हभप संतोष गावंडे महाराज, हभप सुनिलभाऊ राऊत, हभप किशोर वालतुरे यांनी दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *