March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.21) – हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने शिवस्मारक प्रांगण बजाजनगर येथे आयोजित कथेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.20) रोजी रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांनी प्रभू श्री.रामजन्मावर आधारित विश्लेषणात्मक कथा सांगितली. श्रीरामकथेला दुसऱ्या दिवशीही भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

काथेस संयोजक तथा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दुसऱ्या दिवशी देखील उपस्थित राहून कथा श्रवण केली.
या कथेत राम जन्मोत्सवानिमित्त महिलांनी पाळणा सजवला होता. त्यातील बाल श्रीरामाला दोरी ओढून अंबादास दानवे यांनी झोका दिला. यावेळी महिलांनी जन्मोत्सवाचे गीत गायन केले. कथेतील रामजन्मनिमित्त परिसरात जोरदार अतिषबाजी करण्यात आली व प्रभू श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परिसरात उत्साहपूर्ण वातावरण होते.

प्रथम हभप. बबन महाराज चौरे, हभप. ह भ प बालगीरी महाराज म्हस्के, अप्पासाहेब महाराज गायके, हभप.बंडू महाराज औताडे, हभप.विजय महाराज निकम, हभप. बाळासाहेब महाराज नटकर यांच्या पुढाकाराने बजाजनगर आणि पंचक्रोशीतील वारकरी मंडळींनी श्रीराम कथेनिमित्त सेवारुपी हरिपाठ व मृदुंग आणि टाळाच्या ठेक्यावर विठ्ठलाचे नामस्मरण केले.

बाळासाहेबांच्या 95 व्या जन्मदिनानिमित्त दररोज 95 दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता.20) रोजी कथेच्या दुसर्या दिवशी कथा झाल्यानंतर बजाजनगर परिसरातील 95 जोडप्यांनी आरती केली.

याप्रसंगी, आयोजक बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, राजेंद्र राठोड, लक्ष्मणभाऊ सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, उपतालुका प्रमुख सचिन गरड, कैलास भोकरे, विष्णू जाधव, गणेश नवले, महेंद्र खोतकर कृष्णा राठोड, सुभाष साबळे, नंदकुमार साळुंखे, शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, बिबन सय्यद, दत्ता वरपे, विश्वास येवले, भाऊसाहेब डमाळे, विभागप्रमुख सुदाम भंडे, बिबन सय्यद, काकाजी जीवरग, बाळासाहेब चनघटे, कैलास हिवाळे, रामनाथ सुरासे, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, नामदेव सागडे, सतीश हिवाळे, करण साळे, विशाल खंडागळे, अमोल पोटे, सौ अनुराधाताई दानवे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवयानीताई डोणगावकर, उपसरपंच कपिंद्र पेरे,

विजय सरकटे, महेंद्र खोतकर, अण्णा कांडेकर, रमेश पाटील, महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, मीराताई पाटील, कमलताई गरड, छाया जाधव, शोभा सरकटे, अनिता डहारिया, वैशाली जिवरग, अलका शिंदे, मीरा चव्हाण, जोत्सना सोनवणे, रूपाली शुक्ला,

मंदा तुपे, सविता वैद्य, लता माळी, छाया कुकलारे, रोहिणी मुळे, मनीषा घाडगे, विद्या राठोड, मिनल राणे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *