March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने भारतीय ग्रामीण पुन्नरचना संस्था संचालित श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, बजाजनगर महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये उत्कृष्ट श्रेणी प्रदान करण्यात आली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळच्या शैक्षणिक देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास भेट देऊन शैक्षणिक कामकाज, पायाभूत सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, महाविद्यालयाचा निकाल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेलेउपक्रम, शिक्षक वर्ग, मुलींचे वस्तीगृह यांची पाहणी व छाननी करून श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, बजाजनगर महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2020-23 मध्ये उत्कृष्ट श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी सर्व पदधिकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांचे मोठे योगदान असल्याचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी सांगितले. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांनी स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *