
वाळूजमहानगर, (ता.7) – विद्यार्थिनींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे. या संदर्भात प्रात्यक्षिक करून दामिनी पथकातील सुभाष मानकर, कल्पना खरात, रामेश्वर छायल, निर्मला निंभोरे यांनी श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, बजाजनगर येथे विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. 
शाळा, महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना टवाळ खोरांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी तसेच छेडछाडीचे प्रकार घडू नये म्हणून दामिनी पथकाच्या सहकार्याने व श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दामिनी पथक महिलांच्या, विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी नेहमी सज्ज असते. काही अनुचित प्रकार घडल्याची माहिती समजताच हे पथक घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन टवाळखोरांचा समाचार घेते. त्यामुळे महिला व विद्यार्थिनींनी कोणालाही न घाबरतात अभ्यासाकडे लक्ष द्यावे. असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थांनींनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन दामिनी पथकाचे संपर्क साधून कशी माहिती घ्यावी. याची जानीव करून घेतली. या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव, शिक्षक व विद्यार्थीनींनी उपस्थित राहून दामिनी पथकांने विद्यार्थ्यास केलेल्या मार्गदर्शनाबाबात आभार व्यक्त केले.
