March 24, 2026


वाळूजमहानगर (ता.28) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देवून वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम ही एक सामाजिक जबाबदारी आहे. याची जाणीव करून देणारी संकल्पना अंमलात आणून वृद्धाश्रमास मंगळवारी (ता.28) रोजी भेट दिली.

वृद्धाश्रमास भेटीदरम्यान कोणत्याही प्रकारची ऊणीव जसे की, वृद्धाना स्वतःच्या मुलाप्रमाणे किवा आपल्याला अपत्य असूनही आपण आज वृद्धाश्रमात आहोत. याची जाण न होऊ देणारी ओळख या भेटीतून जोपासली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमास फळे, नाश्ता व प्राथमिक उपचार सामग्री वाटप हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात पथनाट्य सादर करून वृद्धाश्रमातील वृद्धाना सामाजिक बांधिलकी व मनोरंजनाच्या एका सुखद क्षणाची जाणीव करून दिली. मातोश्री वृद्धाश्रमास सदिच्छा भेट देवून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन एकनाथ जाधव, प्राचार्य डॉ. संतोष दत्तात्रय शेळके, प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *