March 23, 2026

 


वाळूजमहानगर, (ता.8) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ एपीटीआय महाराष्ट्र राज्य आणि आयपीआय छत्रपती संभाजीनगर शाखा यांच्या सयुक्त विद्यामाने 28 फेब्रुवारी व 1 मार्च दरम्यान ‘फार्मास्युटिकल सायन्समधील अत्याधुनिक प्रवृत्ती’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जॉन्सन अँड जॉन्सनचे अनुराग कल्याणी, आरवी लाइफ सायन्सेसचे श्रीपाद देशपांडे यांची उपस्थिती होती. या परिषदेला संपूर्ण भारतातून 350 हून अधिक जण सहभागी झाले होते. यावेळी वॉकहार्ट रिसर्च सेंटरचे डॉ. मनोहर नंदनवार यांनी आधुनिक औषध शोध धोरणे आणि नियामक आवश्यकता याविषयी माहिती दिली. तर डॉ. सचिन भुसारी यांनी औषध निर्मितीतील प्रक्रिया विश्लेषण तंत्रज्ञान पीएटी यावरील व्याख्यान दिले. डॉ. स्वरूप लाहोटी यांनी औषध संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय भूमिकेवर सखोल चर्चा केली. डॉ. दीपक लोकवानी यांनी एआय आधारित औषध शोध प्रक्रियेवर प्रकाश टाकला. परिषदेच्या समारोपप्रसंगी सहभागी संशोधक आणि विद्यार्थ्यांना नव्या ज्ञानाचा उपयोग अभ्यास, संशोधन आणि औषधनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संस्थचे सचिव एकनाथ जाधव, संयुक्त सचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव यांची विषेश उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *