-
वाळूजमहानगर, ता.3 – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे शाळा, महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवती व महिला यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आत्मसंरक्षण आणि जागरूकता सत्रात दामिनी पथकाने प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी दामिनी पथकाच्या कांचन निरधे यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या छेडछाडीचे प्रकार, महिलांना होणारा त्रास. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच असे प्रकार घडल्याची माहिती समजल्यानंतर दामिनी पथकच अशा ठिकाणी धडक मारून टवाळखोरांचा समाचार घेते. दामिनी पथक सर्व महिलांच्या, विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी सतत सज्ज असते. अशी माहिती दिली. याशिवाय स्वतः संरक्षण कसे करावे. या संदर्भात दामिनी पथकाने प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे, हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, महिलापोलिस अमृता भोपळे, अयोध्या दौंड, आणि मनिषा बनसोडे, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, हर्षला जाधव, सहसचिव अमन जाधव, डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थिती होती.