
वाळूजमहानगर, (ता.30) – भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड) दीक्षांत समारंभ व विद्यार्थी मेळावा बुधवारी (ता.25) जानेवारी 2025 रोजी झाला. यावेळी मान्यवऱ्यांच्या उपस्थितीत 88 विद्यार्थाना पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अजंता फार्माचे वरिष्ठ व्यवस्थापक आशिष सोनवणे हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यानी समाज आणि देशाच्या विकासात हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मासिचे बरेचशे विद्यार्थी आज चांगल्या औद्योगिक व शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. तर बरेचशे विद्यार्थी हे उच्चशिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके व कार्यकारी अधिकारी बी. बी. जाधव यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्राध्यापक रश्मी चौथे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
