वाळूजमहानगर, ता.26 – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याबाबत तंत्रशिक्षण संचालनालायातील विशेष कार्यकारी अधिकारी सीमा बोर्डे यांनी गुरुवारी (ता.23) रोजी मार्गदर्शन केले.
भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसचिव अमन जाधव, प्राचार्य डॉ. संतोष शेळके व कार्यकारी अधिकारी बी. बी. जाधव यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी विद्यार्थी जीवनात भविष्याच्या घडामोडी कश्या संभाळाव्यात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ. विद्या मगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.