वाळूजमहानगर, ता.13 – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नवांकुर कोहोर्ट 3.0 मध्ये प्री-इन्क्युबेशनसाठी दोन स्टार्टअप प्रकल्पांची यशस्वी निवड केली आहे.
तुषार डांगरे आणि पवन सौदागर यांनी ‘क्विक स्टे’ हा प्रकल्प सादर केला असून त्यांना प्रा. पल्लवी भोसलेंचे मार्गदर्शन लाभले. तसेच, साक्षी वटाणे यांनी ‘न्युट्री सीड्स’ हा प्रकल्प सादर केला असून डॉ. प्रभाकर पानझडे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. या यशाबद्दल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.