वाळूजमहानगर – विद्यार्थ्यांनी बजाजनगर परिसरातून जागरूकता रॅली काढून व अतिशय उत्स्फूर्तपणे पथनाट्यांमधून फार्मासिस्टचे महत्व लोकांना पटवून देत बजाजनगर येथील श्रीनाथ फार्मसी विद्यालयात फार्मासिस्ट डे अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
फार्मासिसिस्ट डे निमित्त श्रीनाथ फार्मसी महाविद्यालयात, पथनाट्य, घोषवाक्य या अंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धेतील बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आर. व्ही. लाईफ सायन्सेस संशोधन केंद्राच्या उपाध्यक्षा डॉ. वरदा बापट या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. बापट यांनी मुलांना फार्मसी क्षेत्रातील गुणवत्ता व संधी याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या सदस्या डॉ. एकता जाधव उपस्थित होत्या. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव व श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी सर्व प्राध्यापक व विध्यार्थ्यांना फार्मासिस्ट डे निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव, डॉ. अनिता वाघ, प्रा. रश्मी चौथे यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांमधून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.