February 21, 2025

वाळूजमहानगर, ता.24- बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ नर्सिंग, प्रथम जीएनएम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी आणि दीप प्रज्वलन समारंभात विद्यार्थ्यांनी रुग्णांची सेवा आणि मानवतेच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली.


दीप प्रज्वलन आणि शपथविधी समारंभ म्हणजे “फ्लोरेन्स नाइटिंगल द लेडी विथ लॅम्प” यांना श्रद्धांजली. हा सोहळा विद्यार्थ्यांना नर्सिंग च्या उदात्त व्यवसायात आणतो. दीपप्रज्वलन या तरुण विद्यार्थ्यांना आजार व जखमी व्यक्तींची काळजी घेण्याची, प्रशिक्षण देण्याचा ठाम निर्णय दर्शवतो. दिवा लावणे हे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि नर्सिंगच्या भावनेच्या हस्तांतरनाचे प्रतिक आहे. दीपप्रज्वलन समारंभात विद्यार्थ्यांच्या नर्सिंग व्यवसायात प्रवेश झाल्याची औपचारिक घोषणा केली जाते. विद्यार्थ्यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या तत्त्वांवर आधारित शपथ घेतली. ज्यामध्ये त्यांनी रुग्णांच्या सेवा आणि मानवतेच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रुग्णसेवेची शपथ दिली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेडगेवर कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रो. अमोल रामटेके, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, हर्षला जाधव, सहसचिव अमन जाधव, डॉ. संतोष शेळके, गोविंद ढगे, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *