March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.13)- अज्ञात दरोडेखोरांनी
शेत वस्तीवर हल्ला करून रोकडे कुटुंबाला लोखंडी गजाने जबर मारहाण करून सोन्या चांदीचा ऐवज हिस्कावला. या वेळी झालेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत घरात कोंडून आरोपी फरार झाले. शुक्रवारी ता.12) रोजी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वस्तीवर राहणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारातील एका शेतात आपेगाव येथील संतोष कचरू रोकडे (36), कविता संतोष रोकडे (30), सुलाबाई कचरू रोकडे (80) व दोन लहान मुली दाम्पत्य कामाला होते. ते शेतातच वस्तीकरून राहत होते. रोकडे कुटुंब नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री जेवण करून झोपलेले असताना अज्ञात चार दरोडेखोरांनी अचानक वस्तीवर प्रवेश केला. यावेळी दरवाजा उघडा होता दरोडेखोरांनी घरात घुसून रोकडे कुटुंबास लोखंडी गजाने मारहाण केली.

यामध्ये संतोष रोकडे यांच्या डोक्यात व डोळ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी कविता रोकडे यामध्ये पडल्याने त्यांनाही दरोडेखोरांनी मारहाण करून जखमी केली. यावेळी दरोडेखोरांनी दोन मोबाईलसह सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून घेत रक्तबंबाळ अवस्थेत वस्तीवरील घरातच कोंडून पसार झाले. त्यानंतर रोकडे कुटुंबांनी कसा बसा दरवाजा तोडून शेजारच्या कुऱ्हाडे वस्तीवर धाव घेत आपबिती सांगितली. या घटनेची माहिती मिळताच आपेगाव, रांजणगाव पोळ येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ग्रामपंचायत सदस्य भागिनाथ रोकडे आणि सहकार्यांनी उपचारार्थ दाखल केले. दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख शेळके, धनंजय गोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून माहिती घेतली.

या प्रकरणी कविता संतोष रोकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम 452, 323, 324, 504, 506, 34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट जमादार धनंजय गोंडे करत आहे. या घटनेमुळे शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून रात्रीची गस्त घालण्याची मागणी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *