वाळूजमहानगर, ता.31 – रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत 10 हजार रुपये लुटणाऱ्या दोघांना शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घाणेगाव शिवारात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज परिसरातील घाणेगाव येथील राजू माझी डोळस (वय 42) हे मंगळवारी (ता.29) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शेतातून घरी येत होते. त्याचवेळी दुचाकी वर दोन भामटे आले आणि त्यांनी राजू यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवला. तुझ्या खिशात काय आहेत, ते दे नसता तुला खुपसून टाकतो. अशी धमकी देत त्याच्या खिशात दहा हजार रुपये रोख बळजबरीने काढून घेतले. दरम्यान आरडाओरड झाल्याने गौरव अग्रवाल, दिपक सिंघ, विष्णु पाडाराय आणि इतर जण धावून आले. आणि चोरट्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याचे नाव गाव विचारे असता सुरेश भिमा मल्ले रा.उखाणा ता.नेवसा जि. अहिल्यानगर, (ह.मु. लक्ष्मीमाता मंदिर रांजणगाव), संतोष काकासाहेब शिंदे रा. गेवराई जि. बीड (ह.मु. रांजणगाव असे सांगितले. या दोघां विरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.