
वाळूजमहानगर, (ता.28) – संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी. असे आवाहन श्री गजानन विद्या मंदिरचे अध्यक्ष आय जी जाधव यांनी केले.

रांजणगाव (शें,पू) येथील श्री गजानन विद्या मंदिरात श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक मंदिर, बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी शाळा आणि श्री गजानन ज्युनिअर कॉलेज रांजणगाव तसेच अगस्त्य आंतरराष्ट्रीय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जाधव हे बोलत होते. या प्रसंगी अगस्त्य फाउंडेशनचे दिलीप भडाईत, उपमुख्याध्यापिका मीरा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मेरा देशपांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुलांना भविष्यातील विज्ञानाची आवड व गोडी कशी निर्माण होईल व मुलांना कोणकोणत्या ट्रेनिंग दिल्या जातात याकडे लक्ष केंद्रित केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, सचिव हरीश जाधव, मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, बी वी. शिरसाठ, रेखा बिदरकर, मीरा देशपांडे, निलिमा रेलेकर, पूजा गिरी, दीपक कोळी, दीपक पठारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय तुपे यांनी केले तर आभार तलवारे यांनी मानले.
