वाळुज महानगर (ता.3) :- शेजारी शेजारी राहणारी मुलगी व मुलगा यांच्यात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये जोराचे भांडण होऊन लाकडी दांडा व चाकुने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत बुधवारी (ता.2) रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या सुमारास साजापूर येथे घडली.
आलमगीर कालनी साजापुर येथील राज मोहम्मद बन्सी (वय 57) व फकिर मोहम्मद शेख हे शेजारी शेजारी राहतात. फकिर मोहम्मद शेख व त्यांचा मुलगा अफरोज शेख यांनी यापुर्वी राज मोहम्मदसोबत किरकोळ कारणावरन वाद करून शिवीगाळ करुन धमकी दिली होती. बुधवारी (ता.2) रोजी सायंकाळी 5.30 राज मोहम्मद नमाज पठण करुन घरी आले असता त्यांचा लहान मुलगा फारुख शेख याने सांगितले की, आपले शेजारी फकिर मोहम्मद शेख यांची मुलगी मुस्कान ही त्यांचे घराचे पत्र्यावर चढुन वालाच्या शेंगा तोडत असतांना मला पाहुन म्हणाली की, ये भाड्या इधर क्या देख रहा है. त्यावर मी तिला म्हणालो की, मैं मैरे घर के आंगण मे खडा हु, तेरे को क्यु देखु, असे म्हणालो, त्यानंतर काही वेळाने गावचे पोलीस पाटील रशिद पटेल हे घरासमोर आले असता त्यांनी मी व माझा मुलगा आमचे शेजारी फकिर शेख यांच्या विषयी सांगत असतांना फकिर शेख यांचा मुलगा अफरोज शेख याने राग मनात धरुन त्याच्या जवळील चाकुने राज मोहम्मद व फारुख शेख यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाजुला सरकल्याने त्याचे पोटाला चाकुने खरचटुन किरकोळ जखम झाली. तेवढ्यात अफरोज याने राज मोहम्मदच्या डोक्यावर व पाठीवर त्याचे हातातील चाकुने पाठिवर दोन ठिकाणी वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फकिर मोहम्मदने शिवीगाळ करुन त्याच्या जवळील लाकडी दांड्याने मारहान करुन जखमी केले. या प्रकरणी राज मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.