February 24, 2025


वाळूजमहानगर, (ता.12) – स्वस्तात शेअर्स खरेदी करुन देऊन ते जास्त भावात विक्री करून मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ग्रुपचे एडमिन व कॅरोलिन क्रुक्स, गोपाल रेड्डी यांनी संगणमत करून तसेच FYRES या ॲपव्दारे पोर्टफोलीओवर शेअर्स खरेदी, विक्री केल्याचे भासवुन वाळुज परिसरातील 43 वर्षीय प्रिंटिंग सुपरवायझरची 34 लाख 60 हजार 300 रुपयाची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी ते एप्रिल 2024 दरम्यान ऑनलाईन घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन सुरेश अमृतकर वय 43, रा. गट नंबर 52 वडगाव को.) हे वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत प्रिंटिंग सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांना 19 फेब्रुवारी रोजी व्हाट्सअप नंबर वर एक लिंक आली. ती ओपन करून अमृतकर हे जॉईन झाले. त्यानंतर एक मोबाईल नंबर पाठवून तो कॅरोलिन क्रुक्स या नावाने सेव्ह करण्यास सांगितला व शेअर मार्केट बद्दल माहिती देत स्वस्तात शेअर खरेदी करून नंतर ते जास्त किमतीत विकून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जास्त पैशाच्या आमिषाला बळी पडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे अमृतकर यांनी दोन व्हाट्सअप ग्रुप जॉईन केले. त्यानंतर ग्रुप ॲडमिन कॅरोलिन क्रुक्स याने गोपाल कावलिय रेड्डी याचा नंबर देऊन ते सर्विस मॅनेजर आहे. या पुढील संपर्क त्यांच्याशी करा असे सांगितले. तसेच ग्रुप टीचर
तेजस खोडाय त्याचाही नंबर देऊन ते शेअर खरेदी विक्री करतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फायरेस ॲप ची लिंक डाऊनलोड करून त्यावर आधार कार्ड व इतर माहिती भरून पाठवली. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट नंबर देत शेअर खरेदी करण्यासाठी 19 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2024 दरम्यान वेगवेगळ्या तारखेत 34 लाख 60 हजार 300 रुपये ऑनलाइन घेतले.
   2 कोटी 58 लाख रुपये जमा
दरम्यान आरोपींनी जास्त पैसा काढण्यासाठी नितीन अमृतकर यांच्या खात्यावर पोर्टफोलीओ ची रक्कम एकुण 2 कोटी 58 लाख रुपये जमा असल्याचे दाखवले. पैशाची गरज असल्यामुळे अमृतकर यांनी त्यांना 45 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात सांगितले, परंतु ते त्यास टाळाटाळ करू लागले. उलट त्यांनी ट्रेड चुकीचा असल्याचे सांगुन अणखीन 30 लाख रुपये भरल्यानंतरच तुम्हाला तुमची रक्कम काढता येईल. रक्कम न भरल्यास खाते गोठविण्यात येईल असेही सांगिण्यात आले.
पोर्टफोलीओ व मोबाईल बंद-
त्यानंतर अमृतकर यांनी वारंवार येव्हढी मोठी रक्कम मी भरु शकत नाही. मला माझे पोर्टफोलीओ वरची रक्कम परत द्यावी. परंतु त्यांनी काहीएक ऐकूण न घेता पोर्टफोलीओ बंद केले. अँडमिन व इतर लोकांचे मोबाईल फोनवर संपर्क केला असता ते फोन उचलत नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच नितीन अमृतकर यांनी पोलिसात धाव घेतली
फसवणुकीचा गुन्हा-
फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तारखेत मोठी रक्कम घेऊन ती परत न करता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी नितीन अमृतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 34, भादंवि. सह कलम 66 (सी ) 66(डी) माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *