February 24, 2025

वाळूजमहानगर (ता.28) :- औरंगाबाद पुणे महामार्गावरील इसारवाडी फाटा ते शेंदुरवादा रोडवर आयशर ट्रक व ऊसाचा ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. मुरमी गावाजवळील लेंडी पुलावर सोमवारी (ता.28) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मुक्तेश्वर शुगर कारखाण्याकडून ऊस खाली करून रिकाम्या दोन ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर चालक जात होता. तर कारखान्याच्या दिशेने आयशर ट्रक येत होता. सोमवारी (ता.28) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात उसाच्या ट्रॅक्टर (एम एच 20, ए एस -2462) भरधाव आलेल्या आयशर ट्रक (एम एच 12,क्यु डब्ल्यू -4302) ने जोरात धडक दिली.

सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमींना ट्रक मधून ओढून बाहेर काढले. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या क्लिनरचा पाय फ्रॅक्चर होऊन जखमी झाला. रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून ठार झालेल्या व्यक्तीचं नाव बाबुराव मोरे रा. वाघुली, पुणे. व सोबत कसलेल्याचं नाव दत्ता रामकिशन भोसले, रा. लोणीकंद, पुणे असे आहे. या अपघाताची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शेंदूरवादा रोड बनतोय मृत्यूचा सापळा
ईसारवाडी फाटा त शेंदरवादा हा रोड मृत्यूचा सापळा बनत असल्याने येथे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून या रोडवर सलग अपघात होत असून यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले. सोमवारी (ता.28) रोजी सकाळी पुन्हा या रोडवर अपघात झाला. ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरला आयशर ट्रक धडकल्याने झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या. यात आयशर मधील चालक व क्लिनर जखमी होऊन आत मध्येच अडकले होते.
………….

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *