February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – अंगारकी चतुर्थी (मंगळी) निमित्त सुमन हॉस्पिटल वाळुज व लीलासन हॉस्पिटल बजाजनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथे सर्व रोग निदान शिबिर मोफत आयोजित करण्यात आले होते.


सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते श्रीक्षेत्र शेंदूरवादा येथील सिंदूरात्मक गणपती मंदिरामध्ये महा अभिषेक व आरती झाल्यानंतर मोफत भव्य रोगनिदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिन, दत्तात्रय जोशी, वैभव जोशी यांच्या मंत्र उच्चारात अभिषेक व महाआरती झाली. या मोफत सर्व रोग निदान शिबिरात डाॕ.अक्षय लघाने, डाॕ.राज भंडारी यांनी रुग्णांचे योग्य निदान करून उपचार केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल गरड, संजय कर्पे, गणेश गिरी, चंद्रकांत डेरे, जयश्री वराडे, करीना जाधव, रूपाली मोरे आदिनी परिश्रम घेतले. शिवसेना विभाग प्रमुख कारभारी दुबिले, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर देशमाने, सरपंच एकनाथ खंडागळे, उपसरपंच अंकुर निकम, आनंदा निकम, बबनराव सुकासे, एकनाथ निकम, मच्छिंद्र निकम, योगेश नरोडे, गोकुळ म्हैसमाळे तिच्यासह परिसरातील भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन या शिबिराचा लाभ घेतला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *