वाळूजमहानगर (ता.9) :- सिडको महानगरचे रहिवासी व वाळूज पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले मोहन पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल सिडको वासियांच्या वतीने मोहन पाटील यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावामुळे मोहन पाटील यांना गहिवरून आले.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा तीसगावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू जाधव पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, भरत अंभोरे, शिक्षक सेना जिल्हाउपप्रमुख लक्ष्मण मुळे, शिवसेना शाखाप्रमुख गणेश कोल्हे, शाखाप्रमुख अशोक दुबिले, शाखाप्रमुख कचरू साळे पाटील, राकेश सक्सेना, उद्योजक यशवंत चौधरी, ज्ञानेश्वर गोल्हार, देविदास चव्हाण, रावसाहेब अंभोरे, लक्ष्मण मुंडकर, सुभाष निकम, अतुल दाभाडे, जीवन पाटील, वृक्षारोपण फाउंडेशन चे विष्णुदास पाटील, गणेश सरकटे, अक्षय केरे, शंकर गावडे, प्रदीप गायके, काशिनाथ गोलांडे, सुनील जगदाळे, आकाश राकडे, गणेश गुणाले, पांडुरंग जाधव, बाबासाहेब काळे, उमाशंकर गुप्ता, श्रीराम गुप्ता यांच्यासह सिडको वाळूज महानगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.