March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गंगापूर उपतालुकाप्रमुखपदी उद्योजक अमोलभाऊ लोहकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे लोहकरे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्याशी चर्चा करून उद्योजक अमोलभाऊ लोहकरे यांची “उपतालुका प्रमुख” पदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेची शिस्त व आदेशांचे तंतोतंत पालन करावे, या अपेक्षेसह ही नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ही नियुक्ती केली असून लोहकरे यांना या नियुक्तीचे पत्र शनिवारी (ता.3) जून रोजी देण्यात आले. या नियुक्तीबद्दल अमोल भाऊ लोकरे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *