
वाळूजमहानगर, (ता.1)- साईनगर सिडको वाळुज महानगर येथील शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपशहर प्रमुख दत्तात्रय भास्करराव वर्पे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे दिलेल्या या राजीनाम्यात वर्पे यांनी असे म्हटले आहे की, शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मी एकवीस वर्षे शिवसेना पक्ष-संघटनेत शिवसैनिक म्हणुन काम केले. परंतु काही कारणास्तव यापुढे मला उपशहर प्रमुखपदी काम करणे शक्य नाही. म्हणुन राजीनामा देत आहे.
