February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.23) – सिडको वाळूज महानगर राजर्षी शाहुनगर वार्ड क्रमांक दोन येथे बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी तर्फेसोमवारी (ता.23) रोजी हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

विजयाताई शिरसाठ महिला आघाडी जिल्हाप्रमुख शिल्पा राणी वाडकर व हर्षदाताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बजाजनगर वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत सदस्या माधुरी राजन सोमासे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडी उपविभाग प्रमुख वर्षाराणी सानप, निर्मला विधाते, कस्तुरा जाधव होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्या माधरीताई सोमासे यांनी उपस्थित महिलांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
यावेळी महिला आघाडी शिवसेनेच्या विजया आगळे, रूपाली सोनवणे, अनिता पवार, पायल पवार, कविता खैरे, विद्या सोमासे, उषा राजपूत, तारामती शिंदे, साक्षी सुरडकर, स्वाती जाधव, विमल डोंगरे, सुवर्णा पाटील, अर्चना माळी, रेशमा मघाडे, लताबाई बावस्कर, सुमित्रा साबळे, रुख्मिणी जगताप, सोनाली देशमुख, माधुरी सागर,नेहा पवार आदीसह सिडको राजर्षी शाहूनगर व सारा वृंदावन मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *