February 19, 2025

वाळूजमहानगर, ता.26 – हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना बजाजनगर शाखेच्या वतीने सिडको वाळूज महानगर -1 साईनगर येथील आरोग्य केंद्रात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेनानेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन मार्गदर्शन केले. यावेळी महिला आघाडी तालुका संघटक अनिता डहारीया, माजी महापौर सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, जिल्हापरिषद सदस्य अनिलभैय्या चोरडिया, उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे, उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, कृ.उ.बा. सदस्य महेंद्र खोतकर, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, विभागप्रमुख रतन नलावडे, संतोष चंदन, काकाजी जीवरग, विनोद सोनवणे, अशोक कटारे, लहू खराटे, दत्तात्रय वरपे, संभाजी काळे, प्रल्हाद सुर्यवंशी, राजेंद्र तरटे, भगवान गायकवाड, बद्रीनाथ दाभाडे, संदीप ठोंबरे, दिलीप पवार, संजय जाधव, सुंदर जगताप, जनार्दन चिल्लारे, विजय कुबेर, रमण चौधरी, नाना शिंदे, चंद्रकांत सोनजे, सागर हनवते, वैभव गायकवाड, दत्तु कोठाळे, अंकुश इधाटे, जावेद शेख, तुकाराम खोपडे, ओम देशमुख, देवेंद्र तरटे, लक्ष्मण चिल्लारे महिला आघाडीच्या रंजना सुर्यवंशी, राधा घाडगे, छाया धर्मे, उषा भाजीभाकरे, राणी स्वामी, लता कोरडे, वैशाली गायकवाड आदींची उपस्थिती होती.
या शिबिरात एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तर्फे डॉ. संजय सेवलीकर, डॉ. विजय साळवे, डॉ. समीर नवल, डॉ. इम्तियाज पठाण, डॉ. दर्शन निखाडे, डॉ. वैष्णवी, मनोहर वानखेडे, सहाय्यक अनिता निकाळजे, मनिषा वानखेडे आदींनी रुग्ण तपासणी, उपचार व मार्गदर्शन केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *