March 24, 2026


वाळूजमहानगर (ता.27) – वाळुज जवळील शिवराई येथे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज, ब्रम्हलिन सद्गुरु गिरी महाराज, ह.भ.प.सहदेवआप्पा (आसेगांवकर) व कृष्ण महाराजांच्या कृपाशिर्वादाने मंगळवार 4 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान अखंड हनुमान जन्मोत्सव त्रिदिनी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिणमुखी जागृत पावन हनुमान मंदिर शिवराई ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे हा कार्यक्रम होत आहे. ह.भ.प. संजय महाराज कुऱ्हाडे (गुरूजी) शिवराईकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 विष्णुसहस्त्रनाम, 7 ते 8 हनुमान चालीसा व श्रीरामरक्षा, स्तोत्र, 5 से 6 हरिपाठ, 7 ते 9 किर्तन व हरिजागर आदी कार्यक्रमासह मंगळवारी (ता.4) रोजी ह.भ.प. संजय महाराज कुर्हाडे (गुरुजी) शिवराईकर,
बुधवारी (ता.5) रोजी ह.भ.प.महंत उध्दव महाराज मंडलीक (श्री क्षेत्र नेवासा) तर गुरुवारी (ता.6) रोजी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान हनुमान जन्मोत्सव सांगता व काला निमित्त ह.भ.प. योगिराज दादा महाराज वायसळ (रामकृष्ण भक्तीधाम लखमापुर) यांचे अमृततुल्य जाहीर हरिकर्तन व नंतर महाप्रसाद होईल.


या सप्ताह दरम्यान मृदंगाचार्य : ह.भ.प.अभिषेक म. जाधव, पारसनाथ म. घनवट, मौलाजी महाराज साबळे, गाराचार्य सर्वश्री.ह.भ.प. कृष्णा म. मते, आण्णा म. गायकवाड, प्रभाकर म.मुळे, बाबुराव म. गंगाखेड, नामदेव म. नरवडे, गोपाल म मगर, उत्तम माऊली, शिवाजी निरफळ: नवतरून भजनी मंडळ लिंबेजळगांव, सुदामराव खजिनदार, कडु मिस्तरी, मच्छिंद्र बोरकर, मोटे मामा, रामनाथ बुवा साबळे, संजय चनघटे, दत्तु चनघटे, गणेश चनघटे. हार्मोनिअम सर्वश्री.ह.भ.प. संजय म. चनघटे, राजुभाऊ सुर्यवंशी, सुभाषराव इथापे, रामकिसन साबळे, कविरपंथी भजनी मंडळ शिवराई सेवा देत असून शिवराई ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *