
वाळूजमहानगर, (ता.29) – वाळुज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील शिवतेज विद्यामंदिर, प्राथमिक शाळा कमळापूर या शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम
शनिवारी (ता.28) रोजी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव मानिषताई भास्करराव म्हस्के या होत्या. तर अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती नरवडे होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ऐश्वर्या मोहिते, अनिता महाले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या औरंगाबादच्या तुळशी ग्रुपने याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. हळदी कुंकू कार्यक्रमाचे महत्व आपल्या गीतातून सादर केले.
माता पालकांची संगीत खुर्चीची स्पर्धा घेण्यात आली. व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पांडव यांनी केले. प्रास्तविक कल्पना कानडे यांनी तर आभार शिंदे यांनी मानले.
