
वाळुज महानगर, (ता.25) -शिवछत्रपती विद्यालय बजाजनगर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेश कृष्णा मयेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला तक्रार निवारण केंद्र छत्रपती संभाजीनगर तसेच दामिनी पथक छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ कॉन्स्टेबल अनिता शिंदे, निर्मला निंभोरे यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश कृष्णा मयेकर यांनी विद्यार्थ्यांना सक्षम कसे बनावे, याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यांनी चालताना घ्यावयाची काळजी, मोबाईल पासून संभाव्य धोके, इंटरनेटच्या जगात होणाऱ्या फसवणुकी, बिना लायसन गाडी न चालविणे, कठीण प्रसंगात घ्यावयाची दक्षता. यासारख्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
तसेच निर्मला निंभोरे यांनी मुलींसाठी कोणती दक्षता घ्यावी. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना गुड टच, बॅड-टच तसेच आजच्या मल्टीमीडिया युगात घ्यावयाची काळजी, आपली कर्तव्य, आपले ध्येय यासारख्या सर्वांगीण विषयावर मार्गदर्शन केले. या पथकाला विद्यार्थ्यांशी एक मित्र प्रमाणे हितगुज साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व अनपेक्षितपणे आपल्यावर आलेले वाईट प्रसंग, आपण त्या प्रसंगात कोणती खबरदारी घ्यावी. या सर्व विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा विद्या भोसले यांनी मुलांना आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहावे. सर्वांनी मोठे ध्येय बाळगून अभ्यास करावा. याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी करंजे, सारिका डोंगरे, विजया कोळी, संध्या जगताप, स्वाती शिरसाट, सुरेखा राजमाने, निकिता ताठे, शांती तूपशेंद्रे, अमोल चव्हाण, गणेश लोंढे, नागेश कदम आदींनी परिश्रम घेतले.
